'मोफत आरोग्य शिबीर' संपन्न


कल्याण प्रतिनिधी : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कल्याण, सिध्देश्वर आळी मित्र मंडळ, कल्याण व महिला बचत गट, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ मार्च २०२० रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजात प्रमुख पाहुणे माननीय श्री. नरेंद्र पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले व सर्व मान्यवरांचा शाल व तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या मनोगतानंतर शिबिरास उपस्थितांचे आरोग्य तपासणीस सुरूवात झाली. साधारणपणे १७५ ते १८० लोकांची तपासणी केली गेली. यात वजन, उंची, रक्त गट, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, डोळ्यांची पर्ण तपासणी. ईसीजी, तसेच वरील तपासण्या संबंधीचे तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वरील शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत पार पडले. .