स्वयंसिध्दा पुरस्कार वितरण सोहोळ्याचे आयोजन

: आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था. अक्षरमदा य ट्युब चॅनल, भारतीय डाक ठाणे विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांना स्वयंसिध्दा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, 'स्वयंसिध्दा' या यू ट्यब मालिकेत नगरसेविका ज्योती मराठे, लता पाटील, नीता आरसुळे, वृषाली मुळ्ये, अश्विनी कुलकर्णी, स्वप्नगंधा करमरकर, कविता वैरागडे, शमशाद बेगम मुल्ला, अजिता घोडगावकर, वैशाली कांदळगावकर, डॉ. नीता निकम, कांचन साळगावंकर, ॲड. विद्या गोळे, अर्चना पाटील, ट्विंकल वीरा, राजश्री मेणकुदळे, सृष्टी कांबळे, अलका भुजबळ, हर्षदा कक्कर, स्नेहल सोपारकर, करिश्मा खर्डीकर, अंजली जोशी, सुजाता नेने, अर्चना वेलणकर, रिदीमा शिंदे, साक्षी परब आदी महिलांचा कार्य प्रवास उलगडून दाखविण्यात येणार आहे. या मालिकेची निर्मिती सुनंदा जोशी, हेमंत नेहते, अॅड. सुधा जोशी यांची असून योगेश जोशी यांनी लेखन दिग्दर्शन व शलाका जयंत पाना यांनी छायाचित्रण केले आहे. स्वयंसिध्दा मालिकेतील मान्यवरांच्या मुलाखती अॅड. आश्लेषा गुजराथी, आरती मुळे, हिमानी कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, मुग्धा घाटे, कल्याणी देवळेकर, प्रांजल हजारे, मानिनी महाजन, दिप्ती डेरे, स्नेहा वाघ, वृषाली शिंदे, गीता जोशी, अॅड. अर्चना सबनीस स्नेहा मले असता साळशिंगीकर, वैभवी तरटे, मीनाक्षी सरोदे, अर्पिता देशपांडे, शलाका जयंत, मनवा कलकर्णी, धनश्री कांदळगावकर, गौरी रानडे, ज्योती कपीले यांनी घेतले आहेत.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता एकता मित्र मंडळ, एकता नगर, डोंबिवली पूर्व येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभाग क्र. ८० च्या नगरसेविका ज्योती मराठे भूषविणार असून संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब, ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्राच्या शिवानी देसाई (उपाध्यक्ष) व प्रविणा देसाई (खजिनदार) डोंबिवली पोस्ट मास्तर स्नेहल कदम आणि संचालक संगीता खर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी विश्वास कुळकर्णी संपादित कल्याण वैभवच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहेतसेच ज्या महिला पालकांना फक्त मुलगी आहे अशा मातांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वाती कुलकर्णी, मग्धा घाटे, आरती मुळे, भालचंद्र घाटेअॅड. यतीन गुजराथी, मच्छिद्र कांबळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. समर्थ नागरी सहकारी पतपेढी कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजकत्व लोकप्रिय दैनिक लोकमतने स्वीकारले आहे. .