मैत्रिणींनो आपले आरोग्य वेळेत सांभाळा - Dt. Sayali Ramdasi, Mob. : 9765988365

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे आरोग्य कसे निरोगी ठेवता येईल यासाठीचा हा केलेला प्रयत्न. बऱ्याचदा घरातील बाई सगळ्यांचे सर्वकाही नीट करत असते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होते.


घरी असणाऱ्या आपल्या मैत्रिणीची वजन वाढण्याची तक्रार असते. गृहिणी म्हटलं की बाई दिवसभर कामात असते पण घरकाम आणि व्यायाम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे घरी असल्याने समोर अनेक डब दिसतात, त्यातील पदार्थ खाल्ले जातात. मुलांचं उरलेलं खा, अन्न वाया जाऊ नये म्हणून खा..अश्याने वजन वाढते. जॉब करणाऱ्या महिलांचे वेगळे प्रॉब्लेम असतात. त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाही. ऑफिसमधील पार्टीज, बाहेरचे खाणं, खाण्याच्या वेळा न पाळणे, बैठे काम यामुळे त्यांचे वजन वाढते.


एका मुलीला आयुष्यात अनेक अवस्थांतून जावे लागते. मुलीची वाढ, लग्न, त्यानंतर शरीरात होणारे बदल, गरोदरपण, बाळंतपण, स्तनपान, मासिक पाळी जाण्याची अवस्था (रजोनिवृत्ती) इत्यादी. या सगळ्यामध्ये शरीराच्या गरजा बदलतात म्हणूनच अन्नपदार्थ आणि लागणारी जीवनसत्वे याचे प्रमाण नीट समजून घेणे आवश्यक असते. महिलांमध्ये नेहमी दिसणाऱ्या तक्रारी म्हणजे थकवा येणे. एमेमिया (शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी), थायरॉईड, हाडांचे विकार (ऑस्टिओपोरोसिस), ह्यात नव्याने समाविष्ट झालेला आजार म्हणजे ताण /Stress.



  • ऍनेमिया 


बऱ्याच महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमीच भरते याचा परिणाम म्हणजे थकवा येणे. यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थ घेणे आवश्यक आहे. गरोदरपणातही याची गरज वाढते. महिलांनी दर महिन्याला आपल्या शरीरातून किती रक्त जाते (मासिकपाळी) त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आहारात लोहाचे प्रमाण वाढवले पाहिजे. लोहाच्या बरोबरीने Vitamin C, प्रथिने (proteins) आहारात घेणे आवश्यक आहे ज्याने लोहाचे शरीरात शोषण चांगले होते. पण कधीही लोहयुक्त आणि कॅल्शिअमयुक्त पदार्थ एकत्र घेऊ नये. हिरव्या पालेभाज्या, तेलबिया, अळीव, ड्रायफ्रुटस, पोहे, बाजरी, राजगिरा, कडधान्ये इत्यादींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात नक्की करावा.



  • थायरॉईड


हॉर्मोनचे प्रमाण कमी, जास्त होते ज्याचा परिणाम शरीरात होणाऱ्या " इतर क्रियांवर होतो. थायरॉईडचे प्रमाण महिलांमध्ये जास्त दिसते. थायरॉइडच्या गोळीबरोबरच या व्यक्तींनी काही अन्नपदार्थ टाळणे आवश्यक असते ज्याला goitrogens म्हणतात. फ्लॉवर, कोबी, पालक, ' सोयाबीन, टोफू, सोयामिल्क, मका, शेंगदाणे, रताळं, स्टॉबेरी हे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात घेणे टाळा. त्याचप्रमाणे हे पदार्थ कच्चे खाण्यापेक्षा शिजवून किंवा प्रक्रिया करून खा. आयोडिन आणि सेलेनियम हे micronutrients असणारे अन्नपदार्थ आहारात जास्त प्रमाणात घ्या.


ऑस्टिओपोसिस 


हा महिलांमध्ये असणाऱ्या एट्रोजेन ह्या हॉर्मोनमुळे लहान वयात फारसा दिसत नाही. हा आजार महिलांमध्ये जास्त वयाच्या पस्तिशी किंवा चाळीशीनंतर दिसायला लागतो. हाडांमधील कॅल्शियम कमी होते, गरोदरपण आणि स्तनपान या दोन्ही अवस्थांमध्ये कॅल्शियमची गरज वाढते. मासिकपाळी पूर्णपणे बंद झाल्यावर शरीरात हॉर्मोनल changes होतात ह्यावेळी हाडे ठिसून होण्याची शक्यता असते. या सर्व अवस्थांमध्ये आहारात कॅल्शिअमयुक्त अन्नपदार्थांचा वापर वाढवला पाहिजेदध, दधाचे पदार्थ जसे दही. ताकपनीर, चीज, नाचणी, तीळराजगिरा, ड्रायफ्रुटस, अंडी, मासेचिकन यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे



  • Strees 


ताण-तणाव आयुष्यात सर्वांनाच आहेत. याचा परिणाम म्हणज काही लोक खूप खातात तर काहींची अन्नातून वासनाच जातेमहिलांना मानसिक जास्त विचार करण्याची सवय असते. त्यामुळे ताण वाढतो. अति stree मुळे हृदयविकार, bloodpressure वाढणे यासारख्या तक्रारी सुरू होतातStree कमी करायचा असेल तर मूड बदलावा लागेल आणि तो कसा करायचा त्याचे उत्तरही आहारात आहे. काही अन्नपदार्थ त्यामध्ये असलेल्या घटकाने आपला मूड बदलू शकतात जसे dark चॉकलेट, दही, केळी, ओटस, कॉफीberries आणि nuts. वैज्ञानिकदृष्ट्या या पदार्थांचा शरीराला काही अपाय नाही पण प्रमाणात घेतल्यास फायदा नक्कीच होईल. मैत्रिणींनो जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची तब्येत छान राहील आणि पर्यायाने संपूर्ण घर आनंदी राहील. चला तर मग आपल्या शरीराची हाक ऐकूयात...आपले आरोग्य वेळेत जपूयात.