समर्थ सहकारी बँकेतर्फे महिला दिन साजरा

कल्याण प्रतिनिधी : दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समर्थ सहकारी बँक लि., सोलापूच्या कल्याण शाखेतर्फे या दिवशी राणी लक्ष्मीबाई उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागहात महिला दिन समारंभाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहण्या डॉ. वैजयंती पतकी व त्यांच्यासह सौ. चिटणीस, सौ. बाविस्कर व रोहिणीताई जाधव या व्यासपीठावर आसनस्थ झाल्यानंतर कार्यक्रमाच प्रायोजक समर्थ सह कल्याण शाखेचे प्रबंधक गौरव चव्हाण यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे प्रयोजन व त्यामागे महिलांप्रती असलेली आदराची, आभमानाची भावना विशद केली. __समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. वैजयंती पतकी यांनी आपल्या मनोगतात आपण डॉक्टर असल्याने त्या दृष्टीकोनातून आपण महिलांच्या दिनचर्येकडे व आरोग्याकडे पहातो. महिलांचे जीवन हे खुपच धावपळीचे, दगदगीचे आहे. असे असताना त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण दुर्दैवाने तसे होत नाही. बहुतांश महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष सटकारी बँक देत नाही. तब्येत बिघडली तरी योग्य औषध उपचार न करता अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या चिंतामध्ये, दुःखामध्ये भरच पडतेमहिलांना परुषांच्या बरोबरीने समाजात वावरायचे असेल तर त्यांनी डोळ्यात तेल घालून आरोग्याची निगा राखली पाहिजेआरोग्य स्वस्थ तर मन स्थिर मन स्थिर तरच प्रगतीचा वेग राखला जावू शकतो. रोहिणीताई जाधव यांनी महिलांनी प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे त्यानंतरच प्रेमाच्या प्रवाहात आपण इतरांना सामावू शकतो व खऱ्या अर्थाने एकसंघ होऊ शकतो. असे सूचित करतांना त्यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी महिलांचे प्रबोधन केले अन्य वक्त्यांनी देखिल महिला दिनानिमित्त आपले विचार मांडलेकार्यक्रमाचे सूत्रसचालन वैजयता शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ८.00 ची असून देखिल महिलांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती नोंदवली. महिला दिनाचा कार्यक्रम असून देखिल पुरुष वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.